मंगळी चतुर्थी निमित्त नवसाला पावणारे श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर आज खुले

अमळनेर (प्रतिनिधी)येथील पानखिडकी परिसरातील श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर मंगळ चतुर्थीनिमित्त २७ रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे.
हे श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर  नवसाला पावणारे म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. भक्तजण ईच्छा पूर्ण झाल्यावर मोतीचुर लाडूचा भोग दाखवीत असतात. ईच्छापूर्ती गणपती मंदिर हे दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर पहिले मातीच्या भिंतीचे होते. गेल्या कालांतराने येथील असलेली भाविकांची मांदियाळी पाहता असंख्य श्री गणेश भक्तांच्या पुढाकाराने या मंदिराचा जिर्णोद्धार होत गेला गेल्या दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या गणपती मंदिराची डॉ. बंगाली, पुसाळकर सर, मोहन गुरव, दत्तूगुरव, पिंगळे व बारी परीवार यांच्या कडून आता पर्यंत नियमित पणे सेवा होत आली असुन आता चारूदत्त जोशी नियमित पणे सेवा करित असतात १० जानेवारी २०२१ रोजी कोरोनाकाळात देखील होम हवन जीर्णोद्धार सोहळा दिमाखात पार पडला. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणुक काढीत कोरोंनाच्या सर्व नियमांचे पालन करीत सोहळा जल्लोषात साजरी करण्यात आला होता. भाविकांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या याच मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा , कलशारोहण वाडी संस्थानचे गादीपती प.पू.प्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. या मंगळी चतुर्थीदिनी सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे मंदिर समितीने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *