अमळनेर (प्रतिनिधी ) तरुण आणि तरुणी एक एक दिवसाच्या अंतराने बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील दहिवद येथे घडली दोन्ही कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल करून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील योगेश चुडामन पारधी (वय २६) हा २१ रोजी घरातून निघून गेला असून त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. तर दुसर्या दिवशी एक २३ वर्षीय तरुणी २२ रोजी मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेली आहे. तिच्या भावाच्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून दोन्ही घटनांचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.