अमळनेर (प्रतिनिधी) येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे प्रतापनगर स्टेशन रोड व बंगाली फाईल परिसरात काशी विश्वेश्वर मंदिराजवळ शिव संपर्क अभियान राबवून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली.
“गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक महिला” या संकल्पनेतून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा संघटिका मनीषा परब यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केलेले उत्कृष्ट काम व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, रिक्षाचालकांना पंधराशे रुपये मानधन व घरकाम करणाऱ्या महिलांना अनुदान, वृद्ध व निराधार महिलांना पगार व मोफत धान्य पुरवठा, गोरगरीब लोकांना शिव भोजन थाळी आदी अनेक कामांची माहिती महिलांना देण्यात आली. याप्रसंगी तालुका संघटिका संगीता शिंदे उपशहरप्रमुख मानेताई , विभाग प्रमुख सोनूताई सोनवणे, ज्येष्ठ शिवसैनिक रामचंद्र परब, ज्येष्ठ महिला शिवसैनिक कुसुमबाई कुंभार, मधुबाई तेलंग, कलाताई पाटील, सीमा सोनार, सखुबाई जाधव, लताबाई कोळी, युवती शिवसेनेची शहर प्रमुख जयश्रीताई बैसाणे, दिपा पाने, मयुरी चौधरी, पद्मावती परब आदी अनेक महिला उपस्थित होत्या.