अमळनेर (प्रतिनिधी) आजारी महिला घरात झोपली असताना घरात घुसून एकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील पाडसे येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , पाडसे येथील २० वर्षीय महिला आजारी असल्याने घरी झोपली होती. तिचे पती व आजे सासू शेतात मजुरीसाठी गेले होते. या वेळी घराच्या बाजूस राहणारा अरुण श्रावण गव्हाणे याने घरात प्रवेश करत सदर महिलेस हात धरून ओढले व महिलेस माझ्याशी संबंध ठेवशील का ? अशी विचारणा केली. सदर महिलेने त्यास ढकलून रस्त्यावर पळ काढून आरडा-ओरड केल्या. त्यामुळे गव्हाणे हा पळून गेला. दुसऱ्या दिवशी आरोपीच्या भावाने व पीडितेच्या पती व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी वाद मिटवला. मात्र आरोपीने महिलेच्या पती व दिराशी पुन्हा वाद घातला. त्यानंतर आरोपीच्या वडील व भावाने महिलेच्या घरी जावून तुम्ही अरुणशी वाद का घातला म्हणत शिवीगाळ केली. त्यामुळे सदर महिलेने आरोपी विरुद्ध लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने तसेच आरोपीच्या वडील व भावाने शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे . त्यावरून भा द वि कलम ३५४, ४४८, २९४, ५०४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास सपोनि राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पोना भास्कर चव्हाण करीत आहेत.