खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वृक्षारोपण, रक्तदान, लाडू वाटपसह आरोग्य शिबीर घेऊन आमदार अनिल पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सर्वपक्षीय मान्यवर, पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनीही दिल्या शुभेच्छा

अमळनेर (प्रतिनिधी ) वृक्षारोपण, रक्तदान, लाडू वाटपसह आरोग्य शिबीर घेऊन अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वपक्षीय मान्यवर, पदाधिकारी , हितचिंतक, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव केला.
राज्य पातळीवरील मंत्री व नेते मंडळी तसेच जिल्हा भरातील नेते,सर्व लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आदींनी भ्रमणध्वनी द्वारे आमदारांना शुभेच्छा दिल्या.प्रामुख्याने संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावाचे पदाधिकारी सर्व समाजाचे पंच मंडळ सदस्य आदींनी आमदारांना शुभेच्छा देऊन सत्कार केलाहितचिंतक, कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांनी शहरभर आमदारांच्या शुभेच्छांचे फलक झळकविल्याने या फलकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

नेत्ररोग तपासणी व मानसोपचार शिबीरास नागरिकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल येथे आयोजित नेत्ररोग तपासणी व मानसोपचार शिबीरास रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभला. नेत्ररोग तज्ञ डॉ. कौस्तुभ वानखेडे व मानसोपचार तज्ञ डॉ. श्रद्धा वानखेडे यांनी तपासणी केली.

५३ किलो लाडू आणि जिलेबीचा गोडवा

तसेच बस स्थानकावरील शिवभोजन केंद्रात आमदारांच्या हस्ते 53 किलो लाडू वाटप करण्यात आले,तर बाजार समिती जवळील शिलनाथ शिवभोजन केंद्रात जिलेबी वाटप करण्यात आली,कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक मंडळ,कर्मचारी वृंद व व्यापारी बांधव यांनी जंगी सत्कार आमदारांचा केला.

वृक्षारोपण करून स्वतः केले रक्तदान

याशिवाय मार्केट आवारात आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,एका संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदारांनी स्वतः रक्तदान केले,संचिन खंडारे मित्र परिवाराने अल्पोहार व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली,राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष दिनेश कोठारी व देविदास देसले यांनी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त एका गरीब होतकरु मुलास सायकल भेट दिली,यापद्धतीने दिवसभर लोकहिताचे कार्यक्रम सुरू होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button