खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेच्याऑनलाइन नोंदणीस मुदत वाढ द्यावी

संकेतस्थळ बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणी संकेतस्थळ अनेकदा बंद असते. तर कधी सुरू असल्यावर धिम्यागतीन चालते. त्यामुळे नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने मुदत वाढून देण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी ८ जूनपासून सुरू होती. मात्र ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही ७ जुलै असल्याने मागील तीन दिवसांपासून साईट (संकेत स्थळ) बंद आहे. काही वेळेस सुरु झाली तर ती संथगतीने सुरू असल्याने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वाढीव मुदतीसाठी आर्थिक फटका नियमित अर्ज सादर करण्याची मुदत ७जुलै ही शेवटची असल्याने पुन्हा ८ जुलैपासून ते १५ जुलैपर्यंत वाढीव मुदत असली तरी मात्र त्यात विद्यार्थ्याना पुन्हा ५०० रुपये जादाची फी (शुल्क )आकारणी दिल्याने आर्थिक झळ विद्यार्थ्याना बसणार आहे. सद्स्यस्थितित सर्वत्र कोरोना महामारीने सर्वाना आर्थिक समस्याना सामोरे जावे लागत असल्याने वाढीव मुदतीत जादाचे शुल्क आकारले जावू नये अशीही मागणीही होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button