खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जानवे येथे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जानवे येथील राजेंद्र फुला पाटील यांच्या कावपिंप्री रोडवरील शेतात कृषी दिन साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती किशोर शिवाजीराव अहिरे, सदस्य रेखाताई नाटेश्वर पाटील, निवृत्ती पंजू बागुल, उपस्थित होते.आदर्श शेतकरी रावसाहेब पाटील, उपसरपंच मनोज पाटील उपस्थित होते. सहा.गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक किशोर पवार, सुनील अहिरराव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बाजारात पुरेश्या प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध असून आवश्यक तेवढीच खते विकत घ्यावीत.पिकास संतुलित मात्रेत खताचा डोस द्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी एम. जे. वर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी केले.अमोल भदाणे यांनी सूत्रसंचलन केले. आर.डी. सोनवणे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button