प्लॉट विकसितसाठीच्या कर्जात बोगस कागदपत्रे आणि जादा दराने व्याज घेऊन फायनान्स कंपनीचा भामटेपणा

अमळनेर शहरातील निरक्षर व्यक्तीची श्रीराम सिटी युनियन फायनान्सने केली लाखो रुपयात फसवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) प्लॉट विकसित करण्यासाठी घेतलेल्या कर्जात बोगस कागदपत्रे आणि ठरलेल्या व्याजापेक्षा जादा दराने व्याज आकारून अमळनेर शहरातील एक निरक्षर व्यक्तीची लाखो रुपयात फसवणूक केल्याचा भामटापणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी श्रीराम सिटी युनियन फायनान्सच्या २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, सुरभी कॉलॉनीतील सुभाष पंडित शिंपी याना लिहिता वाचता येत नाही. त्यांनी त्यांच्या मालकीचा गट नं १३९९ / १/२ हा विकसित करण्यासाठी श्रीराम सिटी युनियन फायनान्स या कंपनीकडे ३० लाख रुपये कर्ज  १३.४२ टक्के व्याज दराने ६० महिन्याच्या दीर्घ मुदतीवर हप्ता पद्धतीने मंजूर करण्यासाठी इंग्रजी भाषेत करारनामा केला. करारनामाचा अर्थ मराठीत समजावून न सांगता ६३ कोरे चेक घेतले आणि त्यांची मिळकत गट नं ४१०१ ही त्यांच्याच खर्चाने गहाण केली. मात्र त्यांनी त्यांच्या रेकॉर्डला ३५ लाख रुपये कर्जाची नोंद करून १३.४२ ऐवजी २२.४२ टक्के दराने व्याजाची आकारणी केली. १६ व्या दिवशी त्यांनी ७ मे २०१४ साली पहिलाच हप्ता ९७ हजार ५०४ रुपये वसूल केला. आतापर्यंत त्यांनी अपहार करण्यासाठी बोगस सॉफ्टवेअर तयार करून चेकचा दुरुपयोग करून
आरबीआयच्या नियमांचे उलंघन  करून अनेक घोटाळे केले. म्हणून सुभाष शिंपी यांच्या फिर्यादीवरून श्रीराम सिटी फायनान्स चेन्नई ची जळगाव शाखा , सुब्रमण्यम कृष्णमूर्ती , वेंकटरामन मुरली , रणवीर देवन , चित्तदास रंजन , विपेंनकुमार , दुर्वासन रामचंद्रन , प्रणव प्रकाश पटनायक , देवेंद्रनाथ सारंगी , शशांक सिंग , माया स्वामिनाथन , गिरीट व्यानहिरंडे लोडव्याक , रामा सुब्रमण्यम चंद्रशेखर , जी एम जिलानी (सर्व रा. चेन्नई) , जितेंद्र चव्हाण व सर्व २०१४ पासूनचे शाखाधिकारी , सर्व कर्जपुरवठा व्यवस्थापक श्रीराम सिटी फायनान्स जळगाव , नाशिक विभागाचे वसुली अधिकारी गायकवाड , राकेश किशोर येवले ,  अतुल चांद्रसिंग संन्यासी , स्मिता सुनील शिरकर तिघे रा जळगाव यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला फसवणूक , बनावट दस्तऐवज  तयार करणे आदी कारणांवरून भादवी ४०६ , ४०९ , ४२० , ४१७ , ४६५ , ४६८, ४७१ , ४७४   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *