खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चासाठी २९ रोजी सभा

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया वसंत मोरे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी २९ रोजी सकाळी ११ वाजता सभा बोलावली आहे. मोरे यांच्यावर १० सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
अमळनेर तालुक्यातील अमळगाव ग्रामपंचायतीत सरपंच सह १२ सदस्य असून रेखा संजय चौधरी , चंदना विश्वास पाटील , मिलिंद गुलाबराव पाटील , नाजूक बन्सीलाल पारधी , ललिता विलास चौधरी , रत्नाबाई रमेश चौधरी , निलेश लक्ष्मण महाले , एकनाथ तिरसिंग भिल , सविता महेंद्र कुंभार , लिलाबाई नामदेव भिल आदींनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे २४ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

अशी होईल अपात्रतेची प्रक्रिया

दरम्यान लोकनियुक्त सरपंचावर सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानन्तर तो अहवाल तहसीलदार जिल्हाधिकारीकडे पाठवतील. त्यांनंतर जिल्हाधिकारी ग्रामसभा आयोजित करतील. त्यात ग्रामसभेने जर सरपंचवर अविश्वास मंजूर केला तरच सरपंच अपात्र ठरविण्यात येतील. मात्र सरपंच अपात्र ठरल्यानन्तर निवडणूक न घेता त्याच प्रवर्गाचा सरपंच ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button