खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथे पाच तर बोदर्ड येथे वीस बांधाचे खोलीकरण सुरू

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कामाचा झाला शुभारंभ

अमळनेर(प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे सिंचन वाढावे म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजने अंतर्गत अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथे पाच तर बोदर्डे येथे वीस बांधाचे खोलीकरण कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या बांधांचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी कृषी सहाय्यक सुरेश लांडगे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, उपसरपंच शशिकांत देविदास काटे, भरत हिम्मतराव पाटील, माजी सरपंच सुनील कन्हैयालाल काटे, दीपक काटे, दत्तू काटे, सतीश काटे, महेश काटे, पृथ्वीराज काटे, जिजाबराव पाटील, गिरीश काटे प्रफुल्ल काटे, पंडित काटे, सुभाष काटे, आण्णाभाऊ काटे, नानाभाऊ शामकांत काटे, सुनील काटे, सदानंद काटे, देवानंद काटे, अनिल काटे, प्रमोद काटे, राजु काटे, योगराज काटे सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

असा होणार निधी खर्च

कोळपिंप्री येथील 5 बांध खोलीकरणाच्या कामासाठी 8.70 लाख रुपये तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर एकुण 20 बांध खोलीकरणाच्या कामासाठी 10.48 लाख रुपये असे एकुन 25 बांध खोलीकरण कामासाठी 19.17 लाख रुपये निधी मंजूर करून नुकताच भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे 25 किमी भागात जलसिंचन वाढणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत उत्साह निर्माण निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button