अमळनेर (प्रतिनिधी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आज २३ जून रोजी अमळनेर दौर्यावर येत आहेत. गलवाडे रोड वरील अंबिका मंगल कार्यालयात आज सायंकाळी ७-०० वाजता ते जळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी संघटना बांधणी बाबत चर्चा व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
यावेळी उपाध्यक्ष तथा रावेरचे आमदार शिरिष चौधरी, कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणितीताई शिंदे (सोलापूर), आमदार कुणाल रोहीदास पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत.
अमळनेर तालुका व शहर मधील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे व संवाद चर्चेत भाग घ्यावा, असे आवाहन अमळनेर तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे व शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केली आहे.