अमळनेर (प्रतिनिधी) न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे धडे देण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून योगाचे महत्व पटवून दिले.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका योगिनी ओवे, रितिका मार्कंडेय, वंदना मराठे, कविता शिसोदे, विद्या पाटील, कामिनी महाजन, स्नेहा एकतारे,अनिल माळी, अश्विनी पाटील, रुचिता पाटील, दीपाली राजपूत, किरण सोनार, प्रेरणा पाटील, दिपाली पाटील, राजश्री चौधरी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतले.