खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

तरुणाने बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन केली आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी)जेडीसीसी बँक कॉलॉनीतील तरुणाने बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे करण उशिरापर्यंत समजले नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील जेडीसीसी बँक कॉलॉनीतील रहिवासी संदीप अंकुश भिल (वय २५) या तरुणाने डॉ. बहुगुणे यांच्या गट नंबर १५७५/३ मधील प्लॉटिंग भागात बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button