अमळनेर (प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गसाठी भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने मोंढाळे येथील दाम्पत्य प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ६ च्या तरसोद ते फागण्यादरम्यान रस्त्यासाठी शासनाने जमीन संपादन केली आहे. या घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही व नव्याने मोजणी करण्यासाठी पारोळा तालुक्याटील मोंढाळे येथील मुरलीधर परबत पाटील व देवकाबाई मुरलीधर पाटील हे दाम्पत्य भूसंपादन अधिकारी तथा अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणास बसले आहेत. या शेतकरी दाम्पत्याने आरोप केला आहे की २०१३ ची संयुक्त मोजणी , २०१९ चा अहवाल , व २०२० मध्ये दाखवलेली खोटी पाईपलाईनचे अहवालाचे पत्र रद्द करावेत. तसेच जमिन संपादन हे राष्ट्रीय महामार्ग कलम १९५६ चा भंग करून पदाचा गैरवापर करून झाले आहे. त्यामुळे नव्याने मोजणी करून न्याय द्यावा या मागणीसाठी उपोषण करण्यात आले आहे.