अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ताडेपुरा भागातील अहिल्यादेवी नगरात दुर्गादेवी मंदिराजवळ किरण बहारे यांनी स्वखर्चाने मंदिर परिसर स्वच्छ करून तेथे चेकर्स लावून नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था शहरातील ताडेपुरा भागातील अहिल्यादेवी नगरात दुर्गादेवी मंदिराजवळ मातीचे ढिगारे पडून मंदिर परिसर खराब झाला होता. चंद्रकांत कंखरे यांच्या मदतीने किरण बहारे यांनी स्वखर्चाने मंदिर परिसर स्वच्छ करून तेथे चेकर्स लावून नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था केल्याने मंदिर परिसर सुशोभित झाला आहे. मंदिराचे पावित्र्य राखले गेल्याने नागरिकांनी किरण बहारे यांचे कौतुक केले.