खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

धार येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई

पोलिसांनी टेम्पोसह ६०० रुपयांची वाळू केली जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून टेम्पो आणि ६०० रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील धार येथे १३ रोजी पहाटे बोरी नदीतील वाळू टेम्पोमधून अवैधरित्या वाहतूक करीत असताना सागर छोटू पाटील (रा. रंजाणे) याला पकडण्यात आले. रात्रीची गस्त करणारे हेडकॉन्स्टेबल कैलास सोनार, संजय पाटील, होमगार्ड सुरेश पवार, सीताराम वडर यांनी ही कारवाई केली. त्याच्या जवळील १२ हजार रुपये किमतीचा टेम्पो व ६०० रुपयांची वाळू जप्त करून ठाणे अंमलदार भास्कर चव्हाण यांनी सागर विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button