खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

जागतिक बालमजुरी विरोधी दिन: 12 जून

• जगभरात दरवर्षी 12 जून या तारखेला ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन (World Day Against Child Labour)’ पाळला जातो.

• “आत्ताच कृती करा: बालमजुरी थांबवा” ही 2021 या वर्षीची जागतिक बालमजुरीविरोधी दिनाची संकल्पना आहे.
2020 या वर्षी “कोविड-19: प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर, नाऊ मोअर दॅन एव्हर” या संकल्पनेखाली हा दिवस पाळण्यात आला.

पार्श्वभूमी

• बालमजुरीच्या समस्येवर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कारवाई व प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याने 2002 साली जागतिक बालमजुरी विरोधी दिनाची स्थापना केली.

• या दिवशी बालमजुरीच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी आणि अश्या बालकांना मदत करण्यासाठी कश्याप्रकारे कार्य केले जाऊ शकते, या संदर्भात निर्णय घेण्याकरिता सरकार, नियोक्ते आणि कामगार संघटना, नागरी समाज आणि जगभरातील लाखो लोक एकत्र येतात.

जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्यावरील चित्रपटाचे प्रसारण

• जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त

दिनांक 12 जून 2021 रोजी, फिल्म्स प्रभाग नोबेल पारितोषिक विजेते आणि बालमजुरी विरुध्दच्या लढ्यात मोठे योगदान देणारे कैलाश सत्यार्थी यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारा माहितीपट प्रसारित करणार आहे. हा चित्रपट फिल्म प्रभागाच्या संकेतस्थळावरून तसेच यू-ट्यूब वाहिनीवरून प्रदर्शित केला आहे.

♟♟येडियुरप्पाच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कायम’.♟♟

🌅कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (कर्नाटकचे प्रभारी) अरुण सिंह यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तम काम करीत आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

🌅करोनाच्या काळात केवळ येडियुरप्पाच नव्हे तर राज्यातील मंत्री, पक्ष आणि प्रत्येकानेच उत्तम कामगिरी केली आहे. उच्चस्तरीय बैठकीत येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सिंह यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

🌅मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांची उचलबांगडी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अफवा आहे. येडियुरप्पांना हटविण्यासाठी कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपमधील एक गट सक्रिय आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती.

: 🎆🎆कू’ या भारतीय समाजमध्यमाचा नायजेरियात वापर.🎆🎆

🩸आफ्रिकेतील नायजेरिया या देशात पाय रोवू पाहणाऱ्या ‘कू’ या भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर नायजेरियाच्या सरकारने अधिकृत खाते उघडले असल्याचे ‘कू’ने गुरुवारी सांगितले.

🩸नायजेरियन सरकार आणि कू चा प्रतिस्पर्धी असलेला ट्विटर यांच्यातील तिढ्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली आहे. अमेरिकी समाजमाध्यम असलेले ट्विटर नायजेरियात अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याची घोषणा तेथील सरकारने गेल्या आठवड्यात केली होती.

🩸‘नायजेरिया सरकारचे अधिकृत हँडल आता कू वर आहे’, असे कू चे सहसंस्थापक व सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी याच समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले. गंमत म्हणजे, त्यांनी हीच माहिती ट्विटरवरही शेअर केली.

🩸नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी एका फुटीरवादी चळवळीबद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट कंपनीने काढून टाकल्यानंतर, आपण ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित करत असल्याचे नायजेरिया सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते. यानंतर आपले समाजमाध्यम नायजेरियात उपलब्ध असून, त्या देशातील नव्या वापरकत्र्यांसाठी नव्या स्थानिक भाषांचा वापर करण्यास आपण इच्छुक आहोत, असे कू ने म्हटले होते.

🌺🌺न्यायमूर्ती संजय यादव: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायधीश.🌺🌺

🎨राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी उत्तरप्रदेश राज्यासाठीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश या पदावर न्यायमूर्ती संजय यादव यांची नियुक्ती केली.

🎨भारतीय संविधानाचे कलम 217(1) भारताच्या राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाचे न्यायधीश नियुक्त करण्याचा अधिकार प्रदान करते.

♟भारतीय उच्च न्यायालय..

🎨भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

🎨सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

केवळ दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.

🎨महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत

💠💠शिक्षण मंत्रालयाचा ‘उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल (AISHE) 2019-20’💠💠

☘भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2019-20 या वर्षासाठी उच्चशिक्षण विषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.

☘या अहवालात देशातील उच्चशिक्षणाच्या सद्यस्थितीविषयी माहिती असून, महत्वाच्या क्षेत्रांमधील कामगिरीचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे.

☘हा उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल (AISHE) दरवर्षी मंत्रालयाच्या शिक्षण मंडळातर्फे प्रकाशित केला जात असून, यंदाचा हा दहावा अहवाल आहे.

🅾ठळक नोंदी…

☘2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांच्या काळात, विद्यार्थी पटसंख्येत (नोंदणीत) 11.4 टक्क्यांची वाढ झाली. याच काळात उच्चशिक्षणात मुलींच्या पटसंख्येत 18.2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

☘वर्ष 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण विद्यार्थी नोंदणी (पटसंख्या) 3.85 कोटी इतकी होती. वर्ष 2018-19 मध्ये ही संख्या 3.74 कोटी इतकी होती. म्हणजेच एकूण पटसंख्येत 11.36 लक्ष वाढ झाली आहे. वर्ष 2014-15 मध्ये एकूण पटसंख्या 3.42 कोटी इतकी होती.
उच्च शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक वर्ष 2019-20 मध्ये 1.01 होता, वर्ष 2018-19 मध्ये तो 1.00 होता. यात झालेली सुधारणा, उच्च शिक्षण क्षेत्रात पुरुष विद्यार्थ्यांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शक आहे.

: 📅 १२ जून : जागतिक बाल कामगार विरोधी दिन

⏳ साजरा करण्यास सुरुवात : २००२ पासून
✅ कोणाकडून : आंतरराष्ट्रीय कामगार संघटना

📌 थीम २०२१ : Act Now : End Child Labour !

📌 थीम २०२० : Protect Children From Child Labour , Now More Than Ever

📌 थीम २०१९ : ” Children Shouldn’t Work In Fields , But On Dreams ”

📌 २०२१ हे ” बाल कामगार निर्मूलन वर्ष ”
Hard times don’t create heroes. It is during the hard times when the ‘hero’ within us is revealed.
🥇
आपका दिमाग एक शक्तिशाली चीज है। जब आप इसे सकारात्मक विचारों से भर देंगे, तो आपका जीवन बदलना शुरू हो जाएगा।
🥇

Believe you can and you’re halfway there
🏆
जीवन में आपकी सच्ची सफलता तभी शुरू होती है जब आप जो करते हैं उसमें उत्कृष्ट बनने के लिए प्रतिबद्ध हो जाते हैं।
🥇
“हमारे सभी सपने सच हो सकते हैं, अगर हम उन्हें आगे बढ़ाने की हिम्मत रखते हैं।”

कधीपण पहिला येण्याचा प्रयत्न करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button