खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघ केल्याने पोलिसांनी केली २५ जणांवर कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यात आता दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली तरी अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. म्हणून पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर २५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून ८००० रुपये दंड वसूल केला.
अमळनेर पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. यात २०० व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता १ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आली.
तर ई चलन प्रमाणे १३ व्यक्तींवर कारवाई करून ६००० रुपये दंड वसूल करण्यात आला.
विना हेल्मेट ॲानलाईन पद्धतीने २ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. गलवाडे रोड नाकाबंदीमध्ये विना कारण फिरणारे १० व्यक्तींवर २०००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button