महिलाला एजन्सीतर्फे बक्षीस म्हणून मिळणार दुचाकी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील भारत गॅस एजन्सीतर्फे नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेत तालुक्यातील बाहेरा येथील महिलेला बक्षीस म्हणून दुचाकी मिळली आहे.
अमळनेर येथील भारत गॅस एजन्सीतर्फे लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून तालुक्यातील बोहरा येथील प्रमिलाबाई एस भिल या गरीब महिलेला दुचाकी बक्षीस म्हणून लागली आहे. १ डिसेंबर २० ते ३० एप्रिल २१ दरम्यान ग्राहकांसाठी ही योजना राबविण्यात आली होती. २५ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात आला, अशी माहिती व्यवस्थापक चंद्रकांत देसले यांनी दिली.