खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ३८५ जणांवर उगारला बेधडक कारवाईचा दंडुका

अमळनेर (प्रतिनिधी ) पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी रिकामटेकड्या फिरणार्‍यावर बेधडक कारवाई करीत तीन दिवसात ३८५ जणांकडून सुमारे ९३ हजार दंड वसूल केला. तर पालिकेतर्फे आज शनिवारी २२ रोजी१२ दुकाने सील करण्यात आली आहेत.
अमळनेर शहरात विनाकारण फिरणारे वाहन चालक ,बिना मास्क आणि शिस्त बिघडवणाऱ्या नागरिकांसह कोविड १९चा नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धुळे रोड कुलगुरू मंगल कार्यालय , पैलाड नाका , महाराणा प्रताप चौक , बाजार पेठ आदी ठिकाणी नाका बंदी करून कारवाई सुरू केली आहे. पोलीस आणि पालिका यांनी संयुक्त कारवाईत विना मास्क वाल्यांवर १२४लोकांवर प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे , १४ लोकांवर ५०० रुपये प्रमाणे तर एका दुकानाला ५ हजार रुपये दंड आणि सील तोडणाऱ्या दुकानाला एक हजार रुपये दंड असा २५ हजार ८०० रुपये दंड करण्यात आला. तर मोटर वाहन कायद्यानुसार ५२ लोकांवर २०० ते १२०० याप्रमाणे एकूण १७ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला. विना हेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्या ५७ वाहन चालकांवर ऑनलाईन पद्धतीने दंड करण्यात आला. गलवाडे रोडवर विनाकारण फिरणारे ३० व्यक्तींना , कुलगुरू मंगल कार्यालयाजवळ ५७ लोकांना ,पैलाड भागात ३३ व्यक्तींना असा १४ हजार ८००रुपये दंड वसूल केला. तसेच २७२ लोकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. एकूण ३८५ लोकांकडून ९३ हजार २०० रुपये दंड करण्यात आला.

यांनी केली बेधडक कारवाई

डी वाय एस पी राकेश जाधव व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी , पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे , पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , हेडकॉन्स्टेबल संजय पाटील , कैलास पवार , अरुण बागुल , विलास बागुल यांच्या पथकाने कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button