खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये सकाळी ११ वाजेनंतरही दुकाने उघडी ठेवणाऱ्यांना केला दंड

अमळनेर (प्रतिनिधी)लॉकडाऊनमध्ये वारंवार सूचना देऊनही दुकानदार सकाळी ११ वाजेनंतर देखील दुकाने सुरू ठेवत असल्याने पालिका पथकाने ११ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांना दुकाने सील करण्याचा इशारा देण्यात आला.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर नगरपालिकेचे  उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , अतिक्रमण विभागाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल , गणेश ब्रम्हे, यश लोहरे , सुरेश चव्हाण , जयदीप गजरे , अविनाश बिऱ्हाडे ,विशाल सपकाळे , जगदीश बिऱ्हाडे , बुद्धभूषण चव्हाण  यांच्या पथकाने भाजीबाजार ,लालबाग , सुभाष चौक , नगरपालिका आदी परिसरात गस्त घालून कारवाई केली.

यांच्यावर करण्यात आली कारवाई

रोचामल प्रॉव्हिजन, संदीप भोई ,नाना भोई,विकी बैसाणे ,कमल मोबाईल , ओमशांती गारमेंट , विपुल गारमेंट , समर्थ रेडियम , ऍपेक्स टेलर ,  शरीफ बागवान , पूजाली मेन्स पार्लर या दुकानदारांना २०० ते ५ हजार रुपये दंड करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button