खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कोरोनाने रविवारी ११ रोजी आणखी ११ जणांचा घेतला बळी, तर पुन्हा ५५ पॉझिटिव्ह आढळले

अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह तालुक्यात कोरोनाने रविवारी ११ रोजी आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. तर पुन्हा ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
अमळनेर येथील न प च्या वतीने शहरात दररोज अँटीजन तपासण्या केल्या जात असताना काल रविवारी ५५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी स्टेट बँक व डॉ. बहुगुणे हॉस्पिटल  परिसरात अँटीजन कॅम्पद्वारे अनेकांची चाचणी झाली. दोन्ही कॅम्प मिळून एकूण ३४४ व्यक्तींची तपासणी केली असता त्यात ५५ लोक पॉझीटिव्ह तर २८९ लोक निगेटिव्ह आलेत. सकाळी ८.३० वाजता कॅम्पला सुरुवात झाली. स्टेट बँक येथे गणेश शिंगारे व टीम तर डॉ. बहुगुने हॉस्पिटल जवळ  प्रसाद शिरसागर व टीम ने अँटिजेन तपासणी केली.यासाठी न प रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन व डॉ. राजेंद्र शेलकर यांचे मार्गदर्शन लाभले,अमळनेर नगरपरिषदेतर्फे कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button