कोरोनाच्या पाश्वभूमीवर शहापूर येथे चार वर्‍हाडीच्या उपस्थितीत आदर्श शुभमंगल

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील शहापूर येथे कोरोनाच्या पाश्वभूमीवर सामाजिक अंतर राखीत चार वर्‍हाडीच्या उपस्थितीत आदर्श शुभमंगल पार पडले. यामुळे या सोहळ्याचे कौतुक केले जात आहे.
शहापूर येथील रघुनाथ सदाशिव पाटील यांचे सुपुत्र तर कळमसरे येथील भगवान आत्माराम चौधरी यांनी सुकन्या यांचा विवाह हा ठरला असताना सध्यस्तीतीत सर्वत्र कोरोना आजाराचे सावट असल्याने त्यांनी या विवाह सोहळ्यात पत्रिका किंवा कुणालाही आमंत्रण न देता, मुलीचे चार नातेवाईक  यात आई वडील आणि भाऊ  यांना बोलावून मुलांकडील आई वडील भाऊ वहिनी असे दहा ते पंधरा नातेवाईक एकत्र येत हा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोना सारखा संसर्ग हा पसरत असल्याने नवरदेव मुलाचे मोठे भाऊ  पशुवैद्यकीय डॉक्टर डिंगबर  पाटील यांनी हा निर्णय घेऊन गावासह परिसरात आदर्श विवाह घडवून यापुढेही असाच विवाह सोहळा संपन्न व्हावा म्हणजे विनाकारण होणारा खर्च कमी होऊन कर्जबाजारी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. असे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *