खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईमताज्या बातम्या

अमळनेर शहरातून दोन तर वाघोदा येथून एक दुचाकी चोरी

अमळनेर  (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील तीन दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. तालुक्यातून वाघोदे आणि शहरातील तिरंगा चौक, प्रसाद नगर येथून या दुचाकी चोरट्याने लंपास केल्या आहेत.
अमळनेर शहरातील तिरंगा चौकातून १६ रोजी महेश रमेशचंद्र जोशी यांची २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच- १९ , एयू- ९९७) घरासमोरून अंगणातून आणि प्रसादनगर येथून विजय दौलत पाटील यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच- १९, बीएस- २२४२) तर तालुक्यातील वाघोदे येथून संभाजी चिंधा यांच्या घरासमोरून प्रवीण सीताराम पाटील यांच्या मालकीची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी( एमएच- १८, बीबी- ४०५६) चोरून नेली आहे. अमळनेर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे ,जनार्दन पाटील आणि कैलास शिंदे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button