अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात रविवारी आलेल्या अहवालात पुन्हा १६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. सुदैवाने एकाचाही बळी गेला नाही.
अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून रविवारी पुन्हा १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही. काळजी घ्या सोशल डिस्टन्स व मास्क आवश्यक आहे. विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सल्ला आमचा , मर्जी तुमची , कोरोना मात्र कोणाचाच नाही तो सर्वाना परेशान करतो, असे ही प्रशासनाने म्हटले आहे.