अमळनेर(प्रतिनिधी) निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी शुक्रवारी अमळनेर शहरात भेट देऊन सूचना दिल्या. तसेच आढावा घेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवून विलगीकरन करणाऱ्या रुग्णांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिवसभरात कोरोना रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करुन रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला,न्यू प्लॉट भागात ५ ठिकाणी,तांबेपुरा, आययुडीपी कॉलनी,मेघनगरी यासह आठ ते दहा प्रतिबंधित क्षेत्रात त्यांनी भेटी दिल्या,पूर्वी ज्याप्रमाणे कोरोना बधितांचा एरिया सील केला जायचा त्याचपद्धतीने आता कोरोना रुग्ण असलेली घरे सील करून ते प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठरविले जात आहे. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी रुग्णांशी सोबत संवाद साधत ते कसे बाधित झाले,लक्षणे काय, अजून कुणाच्या संपर्कात ते आलेत, काही त्रास आहे का,आदी प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेतली,सकाळी ८ वाजेपासून ते अमळनेरात आल्यानंतर १० वाजेपर्यंत त्यांनी भेटी दिल्या,नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.आरोग्य पथकाला तपासणीबाबत आवश्यक निर्देश दिले,यात रूग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांची कोरोना चाचणी करा व बधितांना आयसोलेटेड करून ते बाहेर फिरणार नाही यावर नियंत्रण ठेवा अश्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार मिलिंद वाघ, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी,नपचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र शेलकर व त्या त्या भागातील आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.