राष्ट्रीय विकलांग पार्टीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातील विकलांग व विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा मिळावी अशी मागणी राष्ट्रीय विकलांग पार्टीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिपक सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष बिरजू छगन चौधरी, शहर अध्यक्ष अमोल मधुकर पाटील, शहर उपाध्यक्ष करिम बागवान , महिला मोर्चा सारीका शर्मा व रमजान पिरण खाटीक यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, बोदवड तालुक्यातील विकलांग व विधवा महिलेवर लखन श्रावण माळी ( रा. बारभाई गल्ली बोदवड) जिल्हा जळगाव) या तरुणाने तीला व तिच्या दोघं मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैगींग अत्याचार केला. तसेच तिचा छळ करून लग्नाची अमिष दाखवून गरोदर केले. तसेच सदरील महिला अशिक्षित असून ती बोदवड पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदविण्यासाठी गेली असताना ठाणे अंमलदार यांनी त्या महिलेचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन साधा अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेऊन तिला ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे पाठवण्यात आले व तेथून तिला महिला पोलिसांनी नेणे गरजेचे असताना तसेच न करता पुरुष पोलिसांनी जळगाव शासकीय आशादीप वस्तीगृहात पाठविण्यात आले. या प्रकरणात तात्काळ दखल देणे गरजेचे असून निवड पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केल्याचे दिसले. तसेच सदरील प्रकरणात तात्काळ दखल देणे गरजेचे असून निवड