आमदार अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना दिली माहिती
अमळनेर(प्रतिनिधी) पाडळसरे धरणासाठी १३५ कोटीं निधीची तरतूद या शासनाने करून दिली आहे. याधिवेशनात एकूण २४० कोटी निधी मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून धरणाचा १०० कोटी निधी आपण डिसेंबरपर्यंत खर्च केल्यास अजून ५० कोटी आपल्याला याच वित्तीय वर्षात मिळणार आहे,त्यासाठी धरणाचे काम अतिशय गतीने करण्याच्या सूचना आपण संबधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारास दिल्या असून कामाकडे माझे संपूर्ण लक्ष राहणार, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. आमदार अनिल पाटील यांचे मुंबई अधिवेशन आटोपून अमळनेरात आगमन झाल्यापासून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.