अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात शनिवारी आलेल्या अहवालात पुन्हा २१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागातील एका वृद्धाचा बळी गेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून शनिवारी पुन्हा २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील एका वृद्धचा मृत्यू झाला आहे. दुसर्या टप्प्यातील हा पहिलाच बळी आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोमवारपासून कोविड केयर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिली. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता कोविड हेल्थ सेंटर ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान अद्यापही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने नाईलाजास्तव जनता कर्फ्यू सारखी बंधणे लादावी लागतील. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.