धार येथी आरोग्य  शिबिरात ९० जणांची केली तपासणी

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत धार येथे असांसर्गिक आजार तपासणी शिबिर झाले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ९० लोकांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी आणि मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरात ३० वर्षावरील ९० लोकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक कर्करोग, स्तनाचा कर्करोग  या  आजारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संशयित रुग्णांना अधिक तपासणी आणि उपचाराकरीता मारवड प्राथमिक आरोग्य  केंद्रात पाठवण्यात आले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश गोकुळ पाटील यांनी  आरोग्यसेवक ठाकूर  आणि  आशा स्वयंसेविका सुनंदा सुभाष गोसावी, वंदना अरविंद बोरसे  यांच्या सहकार्याने रुग्ण तपासणी केली. या शिबिराला धारचे उपसरपंच शशिकांत माधवराव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र तुळशीराम पाटील,  सदस्या दमोताबाई सखाराम पाटील, भानुदास आत्माराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *