फोटो इतरांना दाखवण्याची धमकी देत महिलेवर एकाने केला अत्याचार

गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयिताला केली अटक

अमळनेर (प्रतिनिधी) महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करून फोटो इतरांना दाखवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पतपेढीच्या चेअरमनसह त्याच्या पत्नीविरुद्ध अमळनेर पोलिसांता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी संशयिताला सायंकाळी घरून अटक केली.
अमळनेर शहरातील गणेश कॉलनीतील रहिवाशी महेंद्र वसंत चौधरी उर्फ नाना करनकाळ हा २०२० पर्यंत सावित्रीबाई  फुले पतपेढीचा चेअरमन होता व पीडित महिला त्याच्या पतसंस्थेची विधी सल्लागार होती.  महेंद्र चौधरी याच्या आग्रहावरून पीडित महिला आणि तिच्या आईने त्याच पतसंस्थेत ६ ते ७ लाख रुपये बचत म्हणून भरले होते. २०१६ मध्ये पिडित महिलेने दत्तू लोटन चौधरी हल्ली मालक महेंद्र चौधरी यांचे घर गहाण ठेवले होते. महेंद्र याने गोड बोलून पीडित महिलेशी जवळीक निर्माण करून प्रेमात रूपांतर केले. वारंवार तिच्याकडून सुमारे १९ लाख रुपये घेतले. तसेच कोर्टात जाऊन महिलेला एकेरी अश्लील भाषेत अपमान करीत, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्याच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध तोडल्यानंतरही त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन शरीर सुखाची मागणी केली. न ऐकल्यास दोघांचे फोटो इतरांना दाखवून धमकी देत असे. याबाबत त्याची पत्नी देखील त्याला सहकार्य करीत होती. पीडित महिलेने याबाबत यापूर्वी तीन वेळा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. तरी देखील तो महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देत होता.  ६ मार्च रोजी महेंद्रने पुन्हा फोटो व व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ११ मार्च रोजी पीडित महिला आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम आटोपून घरी परत आली असता तिला एकटी पाहून त्याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पत्नी ज्योतीने काठी उगारून बाहेर जाण्यापासून रोखले. पीडित महिलेने आपल्या भावासोबत जाऊन अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून महेंद्र वसंत चौधरी उर्फ नाना करनकाळ व ज्योती वसंत चौधरी यांच्याविरुद्ध भादवी कलम ३७६, ३५४ अ (१) (४), ३४, ३५४ड (२) ,४४८ ,५०४, ५०६ प्रमाणे अत्याचार, विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय राकेशसिंग परदेशी करीत असून आरोपीला काल सायंकाळी घरून अटक करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *