खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पाडळसरेसाठी आणखी ५० कोटींच्या निधीची पुरवणी मागणी करणार

आमदार अनिल पाटील यांचा धरण जनआंदोलन समितीतर्फे सत्कार

अमळनेर(प्रतिनिधी) ‘जळगावच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी पाडळसरे प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्याचे माझे आग्रही म्हणणे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लक्षात घेतल्याने माझ्या प्रयत्नांना यश आले आहे. डिसेंबरपर्यंत जाहीर १३५ कोटींचा निधी खर्च झाल्यास आपण अजून ५० कोटींची पुरवणी मागणी करणार आहोत, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी धरण जनआंदोलन समितीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
पाडळसरे धरणासाठी अर्थसंल्पीय अधिवेशनात १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त करून घेतल्याने पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वागत करून सत्कार करण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अमळनेर येथे गुरुवारी आमदार अनिल पाटील परतले. रेल्वे स्थानकावर टोप्या घातलेले पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. आ.अनिल पाटिल यांचा सत्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी बोलतांना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी धरणाच्या २० वर्षाच्या इतिहासात अशी एकरकमी भरीव तरतूद झालेली नव्हती. आघाडी सरकारने कठीण काळात धरणाला पैसा दिला आहे. आमदार अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना धरणावर आणून केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे हे फळ आहे, असे सांगितले. या वेळी सुभाष चौधरी , प्रशांत भदाणे , सुनील पाटील, देविदास देसले, योगेश पाटील , महेश पाटील ,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचेसह डी.एम. पाटील , रविंद पाटील, सौ.वसुंधरा लांडगे, सौ.प्रतिभा पाटील, ऍड.तिलोतमा पाटील , रामराव पवार , श्रावण पाटील, सुपडू बैसाने आदिंसह जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने मास्क लावून उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत आणि गौरव-

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही आमदार अनिल पाटील यांचे स्वागत आणि गौरव करण्यात आला. या वेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, प्रदेश ग्रंथालय पदाधिकारी रिता बाविस्कर, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, रणजित पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, हेमंत पवार, अर्बन बँक व्हॉईस चेअरमन प्रवीण पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, विनोद कदम सर, प्रविण पाटील (भटू ), गणेश भामरे, गौरव पाटील, बाळू पाटील, भूषण भदाणे, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, सचिन बेहरे, प्रदीप पाटील, महेश पाटील, निनाद शिसोदे, दर्पण वाघ, शुभम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, कल्पेश गुजराथी, यतीन पवार, अमोल पाटील, पंकज पाटील, उमेश पाटील, असिफ पिंजारी, पप्पू कलोसे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button