आमदार अनिल पाटलांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथून खापरखेडा जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमीपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यामुळे बोरी काठावरील गावातील नागरिकांचा फेरा वाचणार आहे.
जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या सेस निधीतून हे काम सुरू करण्यात आले असून वाहनांना बोरी काठावर व बोरीकाठावरील गावांना इकडे मारवड भागात येण्यासाठी मधला मार्ग म्हणून पर्यायी रस्ता मिळणार आहे. मारवड येण्यासाठी अथवा बोरीकाठ वरील गावांना जाण्यासाठी यापूर्वी अमळनेर मार्गाने जावे लागत असे आता हा मोठा फेरा वाचणार आहे. या वेळी बाजार समितीचे माजी संचालक व माजी सरपंच एच. एस. पाटील, एस. टी. कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, धारचे सरपंच दगडू सैंदाने, उपसरपंच शशिकांत पाटील, अलीम मुजावर, सुरेश पाटील, सुभाष पाटील, संजय पाटील, भानुदास पाटील, रज्जाक शहा, यशवंत पाटील, रमेश पाटील, बाबू पेंटर, सुरेश पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, सिद्धार्थ साळुंखे, भरत पाटील, प्रकाश पाटील, वासुदेव पाटील, जुबेर मुजावर, वैशोद्दीन मुजावर, सागर पाटील, अरुण पाटील आदी नागरिक उपस्थित होते.