मास्क न लावलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसह १६ जणांना केला दंड

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी व अतिक्रमण विभाग पथकाने मास्क न लावलेल्या आणि सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील १६ दुकानदार आणि इतरांवर दंडात्मक कारवाई करून कोरोना नियमांचे पालन करण्याची समज दिली.
नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , यश लोहरे , जगदीश बिऱ्हाडे , अविनाश बिऱ्हाडे , विशाल सपकाळे , जयदीप गजरे यांच्या पथकाने  शनिवारी शहरातील विविध भागात दुकानांमध्ये धाडी टाकून दुकानदार तथा ग्राहकांवर कारवाई केली. विशेष म्हणजे नगरपालिकेत कार्यालयात काम करताना मास्क न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यांच्यावर केली दंडात्मक कारवाई

कारवाईमध्ये प्रामुख्याने दिनेश पाटील , साजिद शेख सफदर , फिरोज पठाण ,भानुदास चौधरी , कीर्ती गजरे , महालक्ष्मी स्वीट , हेमंत महजन , अनिल पोहा , आंनद पाटील , कमलेश कोचर , सुदीप मेडिकल , किशोर चौधरी ,योगेश पाटील , कोमल मेडिकल , प्रभात रेस्टॉरंट , गायत्री ट्रॅव्हल्स , धवल ऑटो  यांच्यावर प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *