नगरपालिकेची थकबाकीदारांवर टाच, तीन मोबाईल टॉवर सील करून दंड

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून थकबाकीदांवर टाच आणली आहे. तीन मोबाईल टॉवरांना सील आणि पाच दुकानदारांनाही थंड ठोठावली आहे.
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी धडक वसुली मोहीम राबवणे सुरु केले असून त्यांच्यासोबत विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, वसुली प्रमुख शेखर देशमुख, बिल कलेक्टर साजिद शेख , सलीम शेख, आबीद शेख यांनी करवाई केली. यात पालिकेची २५ लाख ५३ हजार ८६८ रुपयांची थकबाकी असलेल्या जे टी एल इन्फ्रास्ट्रक्चर पुणे कंपनीचे तीन भ्रमणध्वनी टॉवर सील करण्यात आले आहेत. तर पाच दुकानदारांना दंड करण्यात आला आहे.  पिंपळे रोड वरील वामननगर मधील टॉवर ची ९ लाख ८ हजार ८४९ रुपये थकबाकी, रामवाडी केशवनगर मधील टॉवरची ९ लाख ४६ हजार ६७६ रुपये तर मंगळ ग्रह मंदिरासमोरील टॉवरची ६ लाख ९८ हजार ३४३ रुपये थकबाकी असल्याने तिन्ही टॉवर सील केले आहेत.
तर अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाने सोशल डिस्टन्स आणि गर्दी तसेच मास्क बाबत नियम न पाळल्याने एस. के. ज्वेलर्स यांना २ हजार , आशिष अलंकार याना १ हजार रुपये, कैलास ट्रेडिंग याना २ हजार रुपये , गुरुनानक दुकानाला २ हजार रुपये आहुजा याना ५०० रुपये  दंड केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *