खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा केला कहर, सोमवारचा आठवडे बाजारही उद्या बंद

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने होणार अंमलबजावणी

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर केला आहे. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल अंतर राखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार ६ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमळनेरचा १ मार्च रोजीचा सोमवारचा फक्त आठवडे बाजार रद्द करण्यात आला आहे. याला प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनीही खबरीलालशी बोलताना दुजोरा दिला आहे. शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी याची नोंद घेऊन आठवडे बाजारात खरेदी विक्रीसाठी येऊ नये, असे आवाहन ही करण्यात आले आहे.

Related Articles

One Comment

  1. दि.१/३/२०२१ चा सोमवारचा बाजार जोमात सुरू.बातमीचा फज्जा उडळली आदेशाची पायमल्ली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button