खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंगल कार्यालय, बँड पथकासह काही दुकानदारांना कारवाईचा केला ‘आहेर’

अमळनेर (प्रतिनिधी)कोरोनाच्या संसर्ग नियमांचे उल्लंघन केल्याने अमळनेर शहरातील एक मंगल कार्यालय, बँड पथकासह काही दुकानदारांना पालिका व पोलिसांनी दंड करून कारवाईचा ‘आहेर’ केला
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यात लग्नात गर्दी, बँडमध्ये एकत्र नाचणे यावर बंदी घालण्यात आली असतानाही अन्नपूर्णा मंगल कार्यालयात 50 लोकांपेक्षा जास्त गर्दी दिसून आल्याने  एपीआय राकेशसिंग परदेशी , आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण , संतोष बिऱ्हाडे , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , अविनाश बिऱ्हाडे ,यश लोहरे , जगदीश बिऱ्हाडे ,जयदीप बेंद्रे , सुरेश चव्हाण , विशाल सपकाळे यांच्या पथकाने अन्नपूर्णा मंगल कार्यालयास ११ हजार रुपये दंड , सोशल डिस्टन्स पाळले नाही म्हणून जय बजरंग बँड याना ५ हजार रुपये दंड ,तोंडावर मास्क लावला नाही म्हणून श्री समर्थ उद्योग केंद्राला एक हजार रुपये दंड ,श्रद्धा मेडिकल पाचशे  रुपये , बॉम्बे क्लाथ स्टोअर्स पाचशे , संजय पापड एक हजार रुपये असा दंड केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button