स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

********************************
*२६ फेब्रुवारी – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन*
********************************

जन्म – २८ मे १८८३
मृत्यू – २६ फेब्रुवारी १९६६

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.

यह तीर्थ महातीर्थो का है,
मत कहो इसे काला पानी,
तुम सुनो यहॉं के धरतीके,
कण-कण से गाथा बलिदानी।

सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. नाशिकच्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना लंडनला अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली.

ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य. तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.
बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात.

पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर, असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर; अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.

सावरकरांनी १९२७ मध्ये उःशाप हे पहिले नाटक लिहिले. ते नाटक “नाट्यकला प्रसारक मंडळाने” रंगभूमीवर आणले. सावरकरांनी सन्यस्तखड्ग नाटक लिहिले. त्यातील शतजन्म शोधताना हे नाट्य गीत अंगावर रोमांच उभे करते. हे नाटक बळवंत नाटक मंडळाने १९३२ मध्ये सादर केले. उत्तरक्रिया हे त्यांचे नाटक भारत भूषण संगीत मंडळाने सदर केले.

दत्ताराम यांना लहानपणी ऐका रानीत कीचकवध नाटकातील सैरंध्रीची भूमिका पाठ करवून घेवून सावरकरांनी त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी सैरंध्री उत्कृष्ट करवून घेतली. १९४३ साली सांगलीस झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शाताद्भी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मन सावरकरांना मिळाला आहे. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.

यही पाओगे मेहशरमें जबां मेरी,
बयॉं मेरा बंदा हिंदवाला हुँ,
यह हिंदोस्ता मेरा
खुशी के दौर दौर है यां रंजो मुहन पहिले
बहार आती है पीछे और खिजां गिरदे चमन पहिले

१९२१ मध्ये अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी उर्दू आणि देवनागरी हस्ताक्षरात लिहिलेल्या २ गझल अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरां मधला देशाभिमान आणि लेखक जागा असल्याच्या खुणा पटवणाऱ्या अशा या गझला व गीत आहे.

विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी निधन झाले.

विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली !

********************************
*२६ फेब्रुवारी – शंकरराव चव्हाण स्मृतिदिन*
********************************

जन्म – १४ जुलै १९२० (पैठण,औरंगाबाद)
स्मृती – २६ फेब्रुवारी २००४ (मुंबई)

डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.

प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल्.एल्.बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण स्वामी रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

१९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली.

१९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाड्याचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजी यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.

कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष.

२६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले.

********************************
*२६ फेब्रुवारी – एल के अनंतकृष्ण अय्यर स्मृतिदिन*
********************************

जन्म – ६ जुलै १८६२ (केरळ)
स्मृती – २६ फेब्रुवारी १९३७

अनंतकृष्ण अय्यर एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव लक्ष्मीनारायणपुरम कृष्ण अनंतकृष्ण अय्यर. त्यांचा जन्म केरळ राज्यातील पालघाट जिल्ह्यातील लक्ष्मीनारायणपुरम गावी ब्राम्हण कुटुंबात झाला.

त्यांनी १८७८ मध्ये पालघाट विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले; तर १८८३ मध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून बी.ए. ही पदवी प्राप्त केली. काही काळ ते केरळ मध्येच विज्ञानाचे प्राध्यापक होते. पुढे त्रावणकोर-कोचीन मानवजातिवर्णन विषयक सरकारी संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले. केरळ मधील जातिजमातींची त्यांनी सखोल व पद्धतशीर पाहणी करून माहिती गोळा केली व ती द कोचीन ट्राइब्ज अँड कास्ट्स या ग्रंथाच्या दोन खंडांत प्रसिद्ध केली (१९०८–१९१२). तसेच त्यांनी मलबार किनाऱ्याजवळील जमातींचेही संशोधन केले.

अय्यर यांनी १९१४ मध्ये भारताच्या पहिल्या वैज्ञानिक काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच त्यांनी भारतात मानववंशीय अध्यापनशास्त्राचे उपनिरिक्षक म्हणूनही काम केले. त्यांनी १९१६ मध्ये मानवशास्त्र विषयावर मद्रास विद्यापीठात व्याख्याने दिली. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास विभागात त्यांनी अध्यापन केले.

१९२१ साली भारतात प्रथमच कलकत्ता विद्यापीठात मानवशास्त्र विभाग उघडण्यात आला. त्या विभागाचे पहिले प्राध्यापक व विभाग प्रमुख होण्याचा मान अय्यर यांना मिळाला.

कलकत्ता विद्यापीठात असताना त्यांनी द मायसोर ट्राइब्ज अँड कास्ट्स  हा ग्रंथ चार खंडांत प्रकाशित केला (१९२८–१९३६). त्याशिवाय त्यांनी १९२५ मध्ये लिहिलेले अँथ्रॉपॉलॉजी ऑफ द सिरियन ख्रिश्र्चन व १९३० मध्ये लिहिलेले लेक्चर्स ऑन इथ्‍नॉग्राफी  हे ग्रंथही उल्लेखनीय आहेत.

ब्रिटिश सरकारने ‘दिवाणबहाद्दुर‘ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९३४ साली त्यांना यूरोपात व्याख्याने देण्यासाठी बोलाविण्यात आले होते. भारतातील मानवशास्त्रीय अभ्यासाचे अग्रदूत म्हणून अय्यर यांचे नाव नेहमीच गौरविण्यात येते. कर्नाटक व केरळ मधील जातिजमातींवरील त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात.

********************************
*२६ फेब्रुवारी – रसायनशास्त्रज्ञ दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा स्मृतिदिन*
********************************

जन्म – ३१ जुलै १८८७ (रत्नागिरी)
स्मृती – २६ फेब्रुवारी १९७१

दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा जन्म मणचे, ता. देवगड, जि. रत्नागिरी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच एका मागोमाग आई आणि वडील निधन पावल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हावनूर, जि. धारवाड येथे झाले. नंतरचे शिक्षण नाशिक व मुंबई येथे झाले.

१९०५ साली मॅट्रिक झाल्यावर गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणूनच त्यांचा एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश झाला. पुढच्याच वर्षी त्यांनी फर्गसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला. १९०९ साली बी.एस्सी. आणि १९११ साली रसायन हा विषय घेऊन एम.ए. (सायन्स) ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने संपादन केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या ओढग्रस्त असताना लिमये यांनी हे यश मिळवले. त्यांचे सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले, इतकी गुणवत्ता त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दाखवली होती. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा लोभ त्यांना मिळाला. त्यामध्ये एल्फिन्स्टनचे प्राचार्य शार्प यांचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी लिमयांना नोकरीही देऊ केली होती, पण ती त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.

प्राचार्य कानिटकरांनी स्थापन केलेल्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कानिटकरांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर तिथे ते स्वकर्तृत्वाने संचालक झाले. औद्योगिक दृष्टीने उपयोगी पडेल असे काम लिमयांनी सुरू केले. त्यामध्ये हिरडा व तरवड यांचे अर्क काढून त्याचा कातडी कमावण्यासाठी उपयोग, लोखंड, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे रासायनिक विश्‍लेषण, काचेवर पारा चढवणे, बिलोरी काचेचे विविधरंगी गोळे बनवणे, पेनची, मुद्रणालयाची, कापडावर छापायची अशी वेगवेगळ्या प्रकारची शाई बनवणे, असे नानाविध प्रकारचे प्रयोग करून ते यशस्विरीत्या पार पाडले.

गोंद, साबण, घासकामाचा कागद इत्यादीचे उत्पादन केले, तर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सूचनेनुसार सिमेंट टेस्टिंगचे कामही केले. निंबोळी, उंडी, करंजेल या वनस्पतींवर त्यांनी संशोधन केले. त्यांना करंजेल मध्ये रवाळ स्फटिकरूप आणि अल्कोहोलमध्ये विरघळणारा फ्लॅव्होन जातीचा नवीन पदार्थ, तेलाच्या साक्यात मिळाला. त्याला ‘करंजिन’ असे नाव लिमयांनी दिले. रसोद प्रक्रिया, रंजोर्व प्रक्रिया, निधोन पद्धती अश वेगवेगळ्या पद्धतींना समर्पक नावे दिली. पाश्चात्त्य संशोधकांनीही लिमयांनी दिलेली नावे वापरली. यावरून त्यांच्या संशोधनाचे आणि प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक बळाची कमतरता असताना त्यांनी असे महत्त्वाचे संशोधन करता येते, हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. अडचणींवर मात करून उत्तम दर्जाचे संशोधन त्यांनी केलेच आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले. त्यांच्या संशोधनानेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.

त्यांचे एकूण ६२ संशोधनपर निबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. तसेच, त्यांनी सुमारे ५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर पातळीवर त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली.

रसायनशास्त्रातील संशोधनास मदत व्हावी म्हणून त्यांनी ‘रसायननिधी’चा शुभारंभ केला. त्यामध्ये प्रथम आपण रु.१,०००/- दिले आणि मग समाजाला आवाहन केले. संशोधनातील कामे सुचतात, पण त्यासाठी निधी नाही, अशी अडचण नवीन पिढीला येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली. खूप प्रयत्नांनंतर विश्वस्तांनी एक लाख रुपये जमा केले. विश्वस्तांनी १९२५ साली रसायनशास्त्रावरील संशोधनास मान्यता दिली आणि १९३० साली रसायननिधी स्थापना विषयक विश्वस्तपत्र लिमयांनी रजिस्टर केले.

१९३० ते १९३९ साली रिसोरसिनॉल हा पदार्थ माहीत होता, पण त्यावर जगभर नवीन संशोधन सुरू होते. लिमये यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर प्रक्रिया करून तीन टप्प्यांत अल्किल रिसोरसिनॉल यशस्विरीत्या मिळवले. या संशोधनाला ‘निधोन प्रोसेस’ हे नाव दिले. त्यामुळे लिमयांचे नाव जगभर ज्ञात झाले. याबाबत त्यांचा संशोधन निबंध त्यांनीच सुरू केलेल्या ‘रसायनम्’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. नोबेल पुरस्कार विजेते प्रा.डोनाल्ड क्रम यांनी १९९० साली अमेरिकन जर्नलमध्ये लिमयांच्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे. यातच लिमयांच्या संशोधनाचे महत्त्व समजते, तसेच संशोधन किती उच्च दर्जाचे होते, त्याची प्रचिती येते. १९६७ साली लिमये यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने  सत्कार केला.

बाळकृष्ण रसशाळा हा औद्योगिक प्रकल्प स्थापन करून त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याची कामगिरी केली. रसायननिधीच्या त्रैवार्षिक सभेस नोबेल पुरस्कार विजेते सर चंद्रशेखर रमण हे आले होते. त्यांनी लिमयेंच्या संशोधनाची माहिती समजून घेतली आणि त्यांच्या कामाविषयी नॅशनल केमिकल सोसायटीच्या समारंभात आणि सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात गौरवोद्गार काढले, ही पण लिमयेंच्या कामाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल.

‘रसायनमंदिर’ या संस्थेला सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे १९६४ साली रसायननिधीच्या विश्वस्तांना ते बंद करावे लागले आणि रसायननिधी पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून विद्यापीठाने प्रा.द.बा. लिमये पदव्युत्तर रसायननिधी शोधवृत्ती चालू केली. १९८७ साली ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ.) तर्फे रसायननिधीच्या व्याजातून देण्यात येणार्‍या शोधवृत्तीमध्ये भर घालण्यात आली. पण ही शोधवृत्ती विशेष कोणालाही ज्ञात नाही.

लिमये यांचे कार्य तीन प्रकारचे आहे. त्यांनी साधन सामग्रीची संपन्नता नसतानाही कल्पकतेने संशोधन करून रसायनशास्त्रातील ज्ञानात मौलिक भर घातली, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संशोधकांची परंपरा निर्माण केली आणि संशोधनासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून रसायननिधीची उभारणी करून त्याचे संवर्धन केले. सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य त्यांनी केले, त्याचा तपशील ‘रसमहर्षी’ या समर्पक शीर्षक असलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल.

*~ दिलीप हेर्लेकर ~*

दिनविशेष-आणि-विज्ञान

********************************
*२६ फेब्रुवारी – आनंदीबाई जोशी स्मृतिदिन*
********************************

जन्म – ३१ मार्च १८६५
मृत्यू – २६ फेब्रुवारी १८८७

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्त धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी “वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया” मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.

सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला. आनंदीबाईंनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की, “मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृति यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे”. आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली. स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोऱ्या डॉक्टरने तिला बिगर-गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहिनात!

आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पीटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला. केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वानं आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला.

एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी-गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.

स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी तिला मिळालीच नाही.

: ********************************
*२६ फेब्रुवारी ● थॉमस कँडी यांचा स्मृतिदिन*
********************************

जन्म – १३ डिसेंबर १८०४ (इंग्लंड)
स्मृती – २६ फेब्रुवारी १८७७ (महाबळेश्वर)

मेजर थॉमस कँडी (Thomas Candy) हे एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ईस्ट नॉयले (व्हिल्टशर, इंग्लंड) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मॅग्डेलेन कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ) येथे शिक्षण घेतले.

कँडीने १८२२ मध्ये भारतीय भाषांचे अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन केल्यामुळे त्यांची ईस्ट इंडिया कंपनीतील पायदळात दुभाषी व क्वार्टर मास्टर ह्या पदांवर शिफारस करण्यात आली. त्यांनी भारतातील ब्रिटिश लष्करात लेफ्टनंट, कॅप्टन व मेजर ह्या हुद्द्यांवर काम केले; तथापि त्यांच्याकडे दुभाषाचेच प्रमुख काम असे. पुढे जेम्स मोल्सवर्थ यांनी त्यांस आपल्या इंग्रजी मराठी कोशकामासाठी साहाय्यक म्हणून घेतले.

दरम्यान मोल्सवर्थ हे इंग्‍लंडला गेल्यामुळे हे काम लांबणीवर पडले. या वेळी कँडी यांनी सरकारी नियमावलीतील मराठी भाषांतरातील काही चुका दुरुस्त केल्या. तेव्हा १८३५ मध्ये सरकारने हिंदु कॉलेज व दक्षिणेकडील सरकारी शाळा यांचा सुपरिटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यांनी अपूर्ण राहिलेल्या इंग्रजी-मराठी कोशाचे काम स्वीकारले आणि परिश्रम घेऊन सहा-सात वर्षांत (१८४० ते ४७) पूर्ण केले.

ह्या कामी त्यांस पुण्याच्या पाठशाळेतील अनेक विद्वान पंडितांचे साहाय्य मिळाले; कारण त्यांच्याकडे १८३७ मध्येच पुणे पाठशाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही आले होते. कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यांवर केंद्रित केले. याशिवाय ते इतरांनी केलेल्या भाषांतरात दुरुस्त्या व सुधारणा करीत असे.

सुबोध, सुटसुटीत व सुसूत्र भाषेवर त्यांचा कटाक्ष असे. अशाप्रकारे नीतिज्ञानाची परिभाषा (१८४८), द इंडियन पीनल कोड (१८६०), न्यू पीनल कोड इत्यादी अनुवादित मराठी पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली. याशिवाय त्यांनी इसापनीतिकथा, हिंदुस्थानचा इतिहास, बाळमित्र, हिंदुस्थानातील इंग्‍लिशांच्या राज्याचा इतिहास वगैरे भाषांतरित पुस्तके त्यांनी तपासली व त्यांत भाषेच्या दृष्टीने अनेक मौलिक दुरुस्त्या व सुधारणा केल्या.

पाठ्यपुस्तकांबाबतचे त्यांचे धोरण समंजस व तत्कालीन शिक्षणास पोषक होते. त्यांनी केलेल्या व सुचविलेल्या पाठ्यपुस्तकांबाबतच्या सुधारणा विधायक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे पुढे त्यांस पूना कॉलेजचे प्राचार्यपद देण्यात आले (१८५१-५७). १८६७ मध्ये काही दिवस ते डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापकही होते. अखेरच्या दिवसांत ब्रिटिश सरकारच्या प्रमुख भाषांतरकर्त्याचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

कँडी यांनी जवळजवळ तीस-बत्तीस वर्षे मराठी भाषेची सेवा केली. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आधुनिक मराठीच्या ग्रांथिक शैलीवर त्यांची फार मोठी छाप आहे. शाळा-खात्याशी व दक्षिणा प्राइझ कमिटीशी कँडी यांचा अधिकारी या नात्याने संबंध होता.

ग्रंथपरीक्षण, मुद्रणालय व भाषांतर यासंबंधीही ते प्रमुख होते. मराठी कोशरचना व व्याकरण तयार  करण्यात त्यांचा हात होता. मराठी पाठ्यपुस्तके तयार करून घेणे, ग्रंथांच्या नवीन आवृत्त्या तयार करणे इत्यादी कामेही सरकारने त्यांच्याकडेच सोपविली होती. अव्वल इंग्रजीच्या आरंभकाळात वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितपणा काढून तिला बंदिस्तपणा आणण्याचे श्रेय कँडी यांनाच द्यावे लागेल. मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम कँडीनेच सुरू केली. मराठी भाषेच्या दृष्टीने इंग्रजी-मराठी कोश हे त्यांचे चिरंतन कार्य होय.

कँडी यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी पुढील ग्रंथ लिहिली.

नीतिबोधकथा, नवीन लिपिधारा, विरामचिन्हांची परिभाषा, वाचनपाठमाला, भाषणसांप्रदायिक वाक्ये, हिंदुस्थानचे वर्णन इत्यादी.

कँडी यांचे भारतात महाबळेश्वर (माल्कमपेठ) येथे निधन झाले.

********************************
*२६ फेब्रुवारी – लिवाइस जीन्सचा संस्थापक लेवी स्ट्रॉस यांचा जन्मदिन*
********************************

जन्म – २६ फेब्रुवारी १८२९
स्मृती – २६ सप्टेंबर १९०२

लिवाइस जीन्सचा संस्थापक लेवी स्ट्रॉस यांचा आज जन्मदिन.

आज जगभरात सुमारे अर्धी लोकसंख्या जीन्सचा वापर करते. जीन्स एवढी प्रसिद्ध होण्यामागे लेवी स्ट्रॉस या उद्योजकाचा दूरदृष्टिकोन आणि उद्योजकतेचे मोठे योगदान आहे. फॅशनतज्ज्ञ मानतात की, अमेरिकेत पहिल्यांदा जी जीन्स वापरली गेली, तिला लेवी स्ट्रॉसने तयार केले होते.

औद्योगिक कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या जीन्सने आता संपूर्ण विश्वात मान्यता मिळवली आहे. त्यांनी १८५३ मध्ये लेवी स्ट्रॉस अॅण्ड कंपनी म्हणजेच लिवाइसची स्थापना केली. यादरम्यान लेवी यांना लाकूडतोडे आणि मजुरांसाठी पॅन्ट बनवण्याचा विचार मनात आला. यासाठी मजबूत प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता होती.

जीन्सच्या मजबुतीसाठी लेवीने जेकब डेविस नावाच्या एका व्यक्तीची मदत घेतली. जेकबने जीन्स पॅन्टच्या कमकुवत भागाला मजबुती देण्यासाठी काही तांब्याच्या वस्तू (आपण जे जीन्सला रिबीट मारलेले बघतो ते) जोडल्या आणि लेवी यांची जीन्स तयार झाली. ही १८७१ ची गोष्ट होती.

दोन वर्षांनंतर डेविस आणि लेवी यांनी एकत्रित नवीन मजबूत डिझाइन्स असलेल्या जीन्सचा २० मे १८७३ ला अमेरिकेत पेटंट करून घेतले. या तारखेपासून घोषणात्मक रूपात जीन्सचा जन्मदिवस मानला जातो.

लेवी आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी स्वत:ची कंपनी आणि व्यवसाय चार भाचे यांच्या नावावर करून गेले. त्यावेळेस लेवींची एकूण संपत्ती ही मालमत्ता सहा मिलियन डॉलर एवढी होती.

लेवी यांचे २६ सप्टेंबर १९०२ रोजी निधन झाले.

******************************** *📚✍️

*📓भारत में सबसे बड़ा, सबसे ऊँचा और सबसे लम्बा इत्यादि , INDIA GK IN HINDI 📓*

सर्वोच्च नागरिक सम्मान
– भारत रत्न

सर्वोच्च वीरता पुरस्कार
– परमवीर चक्र

सबसे बड़ी झील (ताजे पानी की)
– वूलर झील, कश्मीर

सबसे बड़ी झील (खारे पानी की)
– चिलका झील, ओडिशा

सबसे बड़ी झील (मानवनिर्मित)
– गोविन्द वल्लभ पंत सागर (रिहन्द बाँध)

सबसे बड़ी झील (छिछले पानी की)
– कोल्लेरू झील (आंध्रप्रदेश)

सबसे बड़ी मस्जिद
– जामा मस्जिद (दिल्ली)

सबसे बड़ा गुम्बज
– गोल गुम्बज (बीजापुर)

सबसे बड़ा चिड़ियाघर
– जुलोजिकल गार्डन (कोलकाता)

सबसे बड़ा संग्रहालय
– भारतीय संग्रहालय (कोलकाता)

सबसे बड़ा गुफा मंदिर
– कैलाश मंदिर, एलोरा (महाराष्ट्र)

सबसे बड़ा पशु मेला
– सोनपुर (बिहार)

सबसे बड़ा सभागार (Auditorium)
– श्री शन्मुखानंद हॉल (मुंबई)

सबसे बड़ा होटल
– ओबेराय-शेरटन (मुंबई)

सबसे बड़ा बंदरगाह
– जवाहरलाल नेहरू बंदरगाह, मुंबई

सबसे बड़ा गुरूद्वारा
– स्वर्ण मंदिर, अमृतसर

सबसे बड़ा चर्च
– सेंट कैथेड्रल (गोवा)

सबसे बड़ा स्टेडियम
– युवा भारती (साल्ट लेक) स्टेडियम, कोलकाता

सबसे बड़ा नदी द्वीप
– माजुली द्वीप (ब्रह्मपुत्र नदी, असम)

सबसे बड़ा प्लेनेटोरियम (तारामंडल)
– बिड़ला प्लेनेटोरियम (कोलकाता)

सबसे बड़ा डेल्टा
– सुन्दरवन डेल्टा

सबसे बड़ा बैंक (सार्वजनिक क्षेत्र का)
– भारतीय स्टेट बैंक

सबसे बड़ा राज्य (जनसंख्या की दृष्टि से)
– उत्तरप्रदेश (2011 की जनगणना के अनुसार 199,812,341)

सबसे बड़ा जिला (क्षेत्रफल की दृष्टि से)
– कच्छ (गुजरात)

सबसे बड़ा राज्य (क्षेत्रफल की दृष्टि से)
– राजस्थान (342,239 वर्ग किमी.)

सबसे लम्बा पुल (नदी पर बना)
– महात्मा गांधी सेतु, पटना

सबसे लम्बा बाँध
– हीराकुण्ड बाँध, लम्बाई 4.8 किमी. (ओडिशा)

सबसे लम्बा रेगिस्तान
– थार (राजस्थान)

सबसे लम्बी नहर
– इन्दिरा गांधी या राजस्थान नहर
(राजस्थान)

सबसे लम्बा ब्रैकट विस्तार (Cantilever span) वाला पुल
– हावड़ा ब्रिज

सबसे लम्बी नदी
– गंगा (लम्बाई 2,525 कि.मी.)

सबसे लम्बी सहायक नदी
– यमुना (1,376 कि.मी)

सबसे लम्बी नदी (बिना डेल्टा वाली)
– नर्मदा

सबसे लम्बा समुद्रतट (Beach)
– मरीना बीच, चेन्नई

सबसे लम्बा समुद्रतट वाला राज्य
– गुजरात (1915.29 किमी.)

सबसे लम्बा समुद्रतट वाला दक्षिण भारतीय राज्य
– आंध्रप्रदेश (1037 किमी.)

सबसे लम्बी विद्युत् रेलवे लाईन
– दिल्ली से कोलकाता वाया पटना

सबसे लम्बी रेलमार्ग
– डिब्रूगढ़ से कन्याकुमारी, दूरी-4286 किमी. (विवेक एक्सप्रेस, समय 82:30 घंटे)

सबसे लम्बा प्लेटफॉर्म
– गोरखपुर (उत्तरप्रदेश), लम्बाई 1.34 किमी.| यह विश्व का सबसे लम्बा रेलवे स्टेशन है|

सबसे लम्बा सुरंग
– पीर पंजाल सुरंग (जम्मू-कश्मीर)

सबसे लम्बा राष्ट्रीय राजमार्ग
– एनएच-7 (वाराणसी से कन्याकुमारी)

सबसे लम्बी सड़क
– ग्रैंड ट्रंक रोड

सबसे ऊँचा बाँध
– भाखरा नांगल बाँध, ऊँचाई 225.5 मी. (हिमाचल प्रदेश)

सबसे ऊँची मीनार
– कुतुब मीनार, ऊँचाई 88.4 मी. (दिल्ली)

सबसे ऊँची सड़क
– खारदुंग-ला दर्रे में स्थित लेह-मनाली सड़क

सबसे ऊँचा दरवाजा
– बुलन्द दरवाजा, ऊँचाई 53.6 मी.
(फतेहपुर सीकरी)

सबसे ऊँचा गुफा
– अमरनाथ (जम्मू-कश्मीर)

>>भारत में सबसे बड़ा , सबसे लंबा और सबसे ऊंचा
सबसे ऊँची झील
– देवताल झील, गढ़वाल
(उत्तराखण्ड)

सबसे ऊँची चोटी
– काराकोरम-2 / K-2 (8611 मी.)

सबसे ऊँचा जलप्रपात
– गरसोप्पा जलप्रपात (292 मीटर ऊँचा), मैसूरू (मैसूर) में

सबसे ऊँचा युद्धस्थल
– सियाचिन ग्लेशियर

सबसे ऊँचा हवाई अड्डा
– लेह (लद्दाख)

सबसे अधिक वनाच्छादित क्षेत्र वाला राज्य
– मध्यप्रदेश (94,689 किमी.)

सबसे अधिक जनसंख्या वाला शहर
– मुंबई (2011 की जनगणना के अनुसार 12,442,373)

सबसे अधिक वर्षा वाला स्थान
– चेरापूंजी के नजदीक मासिनराम (1082 सेमी. वार्षिक वर्षा)

सबसे तेज गति से चलने वाली ट्रेन
– गतिमान एक्सप्रेस (नई दिल्ली से आगरा), गति 160 किमी/घंटा (टेल्गो – 180किमी/घंटा, प्रस्तावित)

सबसे छोटा राज्य (जनसंख्या की दृष्टि से)
– सिक्किम

सबसे छोटा राज्य (क्षेत्रफल की दृष्टि से)
– गोवा

सबसे घनी आबादी वाला राज्य
– बिहार(1102 व्यक्ति प्रति वर्गकिमी)

सबसे पुराना चर्च
– सेंट थॉमस चर्च (पलायुर,त्रिचूर)

सबसे गहरी नदी घाटी
– भागीरथी एवं अलकनंदा नदी घाटी

विश्व की सबसे लम्बी मूर्ति (statue)
– स्टैच्यू ऑफ यूनिटी, ऊँचाई 182 मी., (साधू बेट द्वीप, गुजरात)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *