दोंडाईचा येथून जळगाव येथे गुटखा नेणाऱ्या वाहनाला मारवड हद्दीत लावला ब्रेक
अमळनेर (प्रतिनिधी) एलसीबीच्या पथकाने दोंडाईचा येथून जळगाव येथे गुटखा नेणाऱ्या वाहनाला मारवड हद्दीत ब्रेक लावून धडक कारवाई केली. यात साडे अठरा लाखाचा गुटखासह २५ लाखाचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील दोघांवर गुन्हे दाखल केले असून चालकाला अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दोंडाईचा येथून जळगाव येथे एका मालवाहू चारचाकीने गुटखा आणला जात असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याना मिळल्यावरून त्यांनी पारोळा महामार्ग तसेच शिंदखेडा अमळनेर रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे,नरेंद्र वारुळे , अश्रफ शेख ,दीपक शिंदे , दादाभाऊ विनायक पाटील ,भरत पाटील यांच्या पथकाला तैनात ठेवले १२ वाजून ४० मिनिटांनी भरवस फाट्याजवळ त्यांना पीक अप व्हॅन (क्रमांक एम एच १८ , बिजी ३७३८) संशयस्पद आढळून आल्याने त्याची तपासणी केली असता त्यात १८ लाख ५६ हजार ८०० रुपयांच्या मोठ्या २० गोण्या , लहान ६० गोण्या विमल गुटखा , केसर गुटखा , तंबाखू ची आढळून आली. चालकांची विचारपूस केली असता चालक अरुण शंकर पाटील (रा. दोंडाईचा) याने गुटखा मालक गोविंद अमरलाल राजानी याचा असल्याचा सांगितले. घटनास्थळी डी वाय एस पी राकेश जाधव, सहा पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी भेट दिली दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर ,सचिन निकम , विशाल चव्हाण तपास करीत आहेत.