अखेर उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी स्वतःहून केली बदलीची विनंती

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील अनधिकृत बॅनर प्रकरणावर पडदा पडल्यानंतर उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी आपल्यासाठी अमळनेरात काम करण्याची अनुकूल परिस्थिती नसल्याने बदली करण्याची विनंती नगरपरिषद संचनालयाच्या संचालकांकडे केली आहे.
उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी नगरपरिषदेच्या संचालकांकडे केलेल्या विनंतीत म्हटले आहे की, अमळनेर शहरात काम करीत असताना मला राजकीय, सामाजिक प्रशासकीय बाबींना सामोरे जावे लागत असल्याने अमळनेरची परिस्थिती माझ्यासाठी अनुकूल नाही. मला मानसिक त्रास होत आहे. माझे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे कामकाजात अस्वस्थता निर्माण झाली असल्याने माझी तडकाफडकी बदली करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *