खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
राजकीय

सुरत महापालिकामध्ये खान्देशाच्या सुपुत्रांनी फडकवली विजयी पताका

अमळनेर (प्रतिनिधी) गुजरात राज्यातील सुरत येथे वास्तव्यात असलेल्या खान्देशाच्या सुपुत्रांनी तेथील महापालिकेत उमेदवारी करीत विजयश्री खेचून आणत महापालिकेत प्रवेश केला आहे. निवडून आलेल्या प्रभागातील विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी निवडणूक लढवल्याने नागरिकांना त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे. यात अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील विक्रम पाटील, कळमसरे येथी सुधाकर लोटन चौधरी (माळी) आणि डॉ. नरेंद्र पाटील मालपूरकर यांचा विजय झाला आहे.
उधना (सुरत) येथील महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत अमळनेर तालुक्यातील  मांडळ येथील रहिवासी व गेल्या ३० वर्ष्यापासून उदरनिर्वाहसाठी उधना येथे वास्तवास असलेले विक्रम पोपट पाटील भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. त्यांनी आपली उमेदवारी उधनाच्या वार्ड क्रमांक २५ मधून केली होती. त्यांचा सुमारे चार हजारच्या वर मताधिक्याने विजय झाला आहे. विक्रम पाटील हे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, पं. स. सदस्य मांडळचे माजी सरपंच डॉ. अशोक हिम्मत पाटील यांचे पुतणे आहेत. डॉ अशोक पाटील व त्यांचा मित्रपरिवार हे गेल्या १५ दिवसापासून त्यांचा प्रचार करण्यासाठी उधना येथे तळ ठोकून होते. डॉ. अशोक पाटील हे मूरब्बी व ज्येष्ठ व अनुभवी राजकारणी असल्याने त्यांचा विजय खेचून आणला आहे. त्यांचा विजयात डॉ. पाटील यांचा मोठा सिहांचा वाटा असल्याचे मत नगरसेवक विक्रम पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मांडळला फटाके फोडून आनंद साजरा

त्यांच्या विजयाने मांडळ गावातून सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच किरण जैन सागर टेलर,भास्कर पाटील, विलास पाटील, साहेबराव पाटील,अनिल पाटील, योगराज पाटील,पिंटू पाटील,गुलाब पाटील,प्रकाश पाटील,रतीलाल पाटील,विजय पाटील,नथ्थु पाटील आदी नी त्यांचे अभिनंदन केले आहे, त्यांच्या विजयाने गावात फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे

कळमसरेच्या सुपुत्राचेही यश

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील सुपूत्र सुधाकर लोटन चौधरी (माळी) यांनीही सुरत महानगर पालिका निवडणूक लाढली. त्यांनीही भाजपच्या तिकिटावरच निवडणुक लढवली असून त्यांनी तब्बल २१३७६ मते मिळवत विजय मिळवला आहे. त्यांच्याही निवडीचे गावात जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

डॉ.नरेंद्र पाटलांची विजयाची यशस्वी शस्त्रक्रिया

सुरत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्र.२६ मधून डॉ. नरेंद्र पाटील मालपूरकर यांनी प्रचंड मतांनी विजय मिळाला. सुरत महापालिका क्षेत्रातील उदना या भागात ते अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहेत. गोरगरीब जनतेने दिलेली ही त्यांच्या कार्याची पावतीच म्हणावे लागेल. डॉ. नरेंद्र पाटील हे मूळचे खान्देशातील असून सुशील मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. तसेच त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई पाटील या देखील अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button