खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

अमळनेरच्या ऊस तोड मुकादमला एकाने सव्वा लाखांत फसवले

अमळनेर (प्रतिनिधी) साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी करीता बैलजोड्या आणि मजूर पुरवण्यासाठी करारापोटी दिलेले सव्वा लाख रुपये अॅडव्हास घेऊन मुकादमची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील बंगाली फाईल भागातील भरत प्रकाश पवार हे उसतोडीचा मुकादम म्हणून काम करतात. ८ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी एरंडोल तालुक्यातील मालखेडा येथील दीपक लक्ष्मण पाटील याना ऊस तोडीच्या २२ मजुरांच्या जोड्या भैरवनाथ शुगर सहकारी साखर कारखाना (मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे सिजन संपेपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक जोडीला ३५ हजार याप्रमाणे ७ लाख ७० हजार रुपयात करारनामा केला होता. यासाठी दीपक पाटील यांना १ लाख रुपये अॅडव्हॉन्स दिला होता. दीपक पाटील यांने मुकादम भरत पवार यांना जामनेर (ता. फत्तेपूर) येथे जोड्या घेण्यासाठी बोलवले. भरत पवार ट्रक घेऊन तेथे गेले मात्र दिवसभर थांबूनही २२ जोड्या दीपक पाटील यांनी आणल्या नाहीत म्हणून त्यांचे ट्रकचे २४ हजार रुपये भाडे देखील बुडाले. वारंवार मागणी करूनही दीपक याने १ लाख २४ हजार रुपये परत केले नाहीत म्हणून पवार यांनी दिलेल्या फिर्यादवरून दीपक पाटील विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कैलास शिंदे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button