महाराष्ट्र पत्रकार संघाच्या खान्देश विभाग कार्याध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची वर्णी

अमळनेर  (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथील युवा पत्रकार वसंतराव दिलीपचंद पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
पाटील यांना त्याबाबतचे नियुक्त पत्र पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे व खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकळा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात येथील नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे ,महापौर सीमा भारतीताई सोनवणे ,आमदार सुरेश भोळे, संपादक मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *