जास्तीचा मिळकत हिस्सा मिळण्यासाठी दोन भावांच्या बनावट सह्या व अंगठा करून केली फसवणूक

अमळनेर (प्रतिनिधी)जास्तीचा मिळकत हिस्सा मिळावा म्हणून जानवे येथे दोन्ही भावांच्या बनावट सह्या व अंगठा करून खोटे दस्त ऐवज बनवून फसवणूक करणार्‍या भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जानवे येथील अर्जुन बुधा पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली की ७ मार्च २०१८ ते १४ मे २० दरम्यान त्यांच्या व त्यांच्या इतर तीन भावांच्या मालकीच्या जमिनी होत्या त्यांचे भाऊ आप्पा बुधा पाटील याने जास्तीचा मिळकत हिस्सा मिळावा म्हणून महसुल अधिकाऱ्यांशी गैरसंगनमत करून वाटणीची नोंद प्रमाणित करून घेण्यासाठी अर्जुन पाटील व भाऊ शांतीलाल पाटील यांची बनावट सही आणि यशवंत बुधा पाटील यांचा बनावट अंगठा करून खोटे दस्त ऐवज बनवले. म्हणून अमळनेर पोलिसात आप्पा बुधा पाटील यांचे विरुद्ध फसवणूक व कागदपत्रात फेरफार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रशांत वाडीले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *