अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील झामी चौकात एलसीबी पथकाने धाड टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्या एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६७० रुपये रोख आणि जुगारीचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एलसीबीचे सहा पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील ,नरेंद्र वारुळे यांना झामी चौकात सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे , दीपक माळी याना सोबत घेऊन छापा टाकला असता आरिफशहा अरमानशहा फकीर (रा. शहाआलमनगर) हा सट्टा-जुगार चालवताना आढळून आला. त्याला पकडून त्यांच्याजवळून६७० रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. नरेंद्र वारुळे यांच्या फिर्यादीवरून जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.