अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित, निम येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीजपुरठा खंडित झाला होता. याच वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नीम येथे शेतकऱ्याला घराच्या अंगणातील पायरीजवळ संर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निम येथे गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता.  यामुळे गावात सर्वत्र अंधार होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातील राजेंद्र हिरामण चौधरी (वय ५१) यांना अंधरातच घराच्या अंगणातल्या पायरीजवळ सर्पदंश झाला. त्यांना चक्कर येऊ लागल्याने अमळनेर येथे पुढील उपचारासाठी आणले असता त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले. १९ रोजी सकाळी अकरा वाजता वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  काल झालेल्या अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गावातील प्रगतीशील शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पच्यात वडील ,भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. ते नाना चौधरी यांचे बंधू असून प्रतिक चौधरी, शाम चौधरी यांचे वडील होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *