राष्ट्रवादीच्या बानोबी मेवाती सरपंचपदी तर नईम खान यांची उपसरपंचपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवत झेंडा फडकावला. तर साठ वर्षांत पहिल्यांदा सर्वसाधारण महिला सरपंचपदी बानो बी इस्माईल खा मेवाती यांची तर उपसरपंचपदी युवा नेतृत्व म्हणून नईम खान कय्युम खान मवाती यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. डी चिंचोरे यांनी काम पाहिले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान वाहेद खान , ज्ञानेश्वर शेनपडू, आबेदाबी वहाब खान, नफिसाबी अमजद , रजियाबी शकील खान, बानोबी मेहमूद शाह, हारून मुमताज खान हे उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मेहमूद खान,फरहान खान, आर.के.खान,रज्जब खान,रिजवान खान,राजा शेनपडू कोळी ,साबीर खान,हारून रशीद खान,नाझिम खान,अली खान ,हशीर वाहेद खान, मेहमूद मुसाशाह फकीर ,शकील अमीर खान,जाकिर खान,शकील मेहबूब खान,आबिद खान ,नसिर पटेल, रऊफ खान,महमद मुनीर,फिरोज शाह,कासम खान,फारुक सर, इस्माईल सेठ,निसार सेठ आदी उपस्थित होते.