कामामध्ये कसुरीचा ठपका ठेवत पीआय अंबादास मोरे कंट्रोल जमा

पीआय दिलीप भागवत यांच्याकडे सोपवला अमळनेर पोलिस ठाण्याचा पदभार

अमळनेर (प्रतिनिधी) शहारात लावण्यात आलेलेल बेकायदेशिर होर्डिंग्जवर कारवाई प्रकरणात एकाच गटाचा गुन्हा दाखल करून घेत उपमुख्याधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून कामात कसुरी केल्याने अखेर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना कंट्रोलजमा करण्यात आहे. तर त्यांच्या जागी जळगाव नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमळनेर शहरातील बेकायदेशीर फलक काढण्यावरून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आणि जैन समाजाच्या लोकांमध्ये वाद झाले होते. त्यांनतर त्या वादाला सामाजिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचे निमित्त करून जैन समाजाने प्रांत, तहसील व पोलिस स्टेशनला मोर्चा काढून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याच वेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनाही धक्का बुक्की, मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र गायकवाड हे एक वरिष्ठ अधिकारी असतानाही पोलिस निरीक्षक अंबादास मोरे हे गुन्हा दाखल करत नव्हते.  गायकवाड यांनी आयजी प्रतापराव दिघावकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. तरीही पोलिस निरीक्षक मोरे यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. न्याय मिळण्याची अपेक्षाच संपल्याने संदीप गायकवाड यांनी फेसबुकवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा इशार देऊन बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने हरवल्याची नोंद केली होती. हे प्रकरण हाताबाहेर गेल्याने खुद्द पोलिस अधीक्षक मुंडे यांना अमळनेरात येऊन तळ ठोकावा लागला. तसेच पोलिस विभागाचीही मोठी बदनामी झाली. त्यामुळे जनहीत आणि कामात कसुर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षकांनी १९ रोजी पीआय मोरे यांच्या बदलीचे तडकाफडकी आदेश काढून त्यांना कंट्रोल जमा केले आहे. या कारवाई ने अमळनेरात जनतेने समाधान व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *