खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
राजकीय

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ

आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी सिंहगड येथून अभियानाला सुरुवात

अमळनेर (प्रतिनिधी)  भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून युवा वॉरियर्स या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पुणे येथील सिंहगड किल्ला येथून या उपक्रमास सुरुवात होणार असून महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात आवड असणाऱ्या युवकांना जोडून त्यांच्यासाठी त्यांना रुची असणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
भाजयुमोतर्फे विविध क्षेत्रातील युवकांनी लोकशाहीच्या प्रक्रियेचा सहभागी व्हावे आणि देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील सहकाऱ्यांसह राज्यभर युवा वॉरियरच्या शाखा निर्माण करणार आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत व शहरी भागात वॉर्ड स्तरापर्यंत शाखांचे निर्माण करण्यात येणार आहे, हे तयार झालेले युवा वॉरियर्स पुढे विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण उपक्रम करून युवांना जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या विषयाचे नियोजन युवा वॉरियर्स राज्य संयोजक अनुप मोरे हे पाहत आहेत.

जळगाव जिल्ह्यातही शाखांचे उद्घाटन होणार

जळगाव जिल्हातही माजी मंत्री गिरिश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ,सुरेश भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शाखांचे उद्घाटन होणार आहे. या वेळी भाजप व भाजयुमो जळगाव ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिकेत विजय पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button