खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

भाजपाला शह देण्यासाठी आमदारांची खेळी; अमळनेर बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या तिलोत्तमा पाटील मुख्यप्रशासक

काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांची प्रशासक मंडळात नियुक्ती


अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे वर्चस्व असलेल्या अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाराष्ट्र शासनाच्या पणन व वस्रोद्योग विभागाने राष्ट्रवादीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांची मुख्यप्रशासक म्हणून वर्णी लावली आहे. तर त्यांच्या सोबतीला काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांची प्रशासक मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे प्रशासक मंडळ निवडणूक होईपर्यंत कारभार पहाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी जळगाव जिल्हा उपनिबंधकाना पत्र पाठवून तिलोत्तमा रवींद्र पाटील (शिरूड ) यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या सोबतच्या प्रशासक मंडळात भागवत केशव सूर्यवंशी (खवशी ) , विजय काशीनाथ पाटील (चौबारी), संभाजी लोटन पाटील (लोण बु), किरण भालेराव पवार (मठगव्हाण ), लालचंद त्र्यंबक पाटील (दापोरी), सुरेश विक्रम पाटील (एकरूखी), भाईदास सोनू अहिरे (भिल)(लोणे), जितेंद्र प्रेमसिंग राजपूत (कळमसरे) यांचा समावेश करण्यात आला आहे.

मंडळावर नियुक्ती करण्यास पात्र असल्याची खात्री करून घेण्याच्याही केल्या सूचना

मंडळावर नियुक्ती करण्यास पात्र असल्याची खात्री करून घ्यावी तसेच ज्या व्यक्तींविरुद्ध न्यायालयात गुन्हे दाखल आहेत, त्या व्यक्तीची नियुक्ती न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून अशासकीय प्रशासक म्हणून करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button